CoronaVirus News: रुग्ण वाढू लागले, महाराष्ट्र, केरळात सर्वाधिक; २४ तासांत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:30 AM2021-02-26T00:30:46+5:302021-02-26T06:56:33+5:30
२४ तासांत मोठी वाढ, मृत्यूही वाढले
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद करण्यात आली असून, तब्बल १६ हजार ७३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारच्या तुलनेत साडेचार हजार रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय गेल्या २४ तासांत सर्वाधिक १३८ रुग्णांचा मृत्यू झाला.
देशातील बाधितांची एकूण संख्या १ कोटी १० लाख ४६ हजार ९१४ असून, त्यातील १ कोटी ७ लाख ३८ हजार ५०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ५१ हजार ७०८ रुग्णांवर (१.३७ टक्के) उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ लाख ५६ हजार ७०५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुक्तीदर ९७.२१ टक्के आहे.आधी रोज १४ लाख चाचण्या होत. आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्ध्यांचे लसीकरण वेगाने करा, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १ कोटी २३ लाख ६६ हजार ६३३ लस दिली आहे. बुधवारी २ लाख १ हजार ३५ जणांना लस देण्यात आली.