CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 01:26 PM2021-05-22T13:26:57+5:302021-05-22T13:27:19+5:30

CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडरसाठी अनेक प्रयत्न करूनही अपयशी; शेवटी तरुण शेतात निघून गेला

coronavirus news corona positive youth oxygen level fine in 3 days after he sits under trees | CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...

CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...

googlenewsNext

पानीपत: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली आहे. मात्र तरीही धोका कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्णांनी नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. त्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. हरयाणातील पानीपतमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला असाच अनुभव आला. 

धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळ

कोरोनाची लागण झाल्यानं एका तरुणाच्या छातीत दुखू लागलं, त्याला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. प्रदीप सिंह असं या तरुणाचं नाव आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यानं आता जे होईल ते होईल अशा विचारानं प्रदीप शेतात जाऊन बसला. एका झाडाखाली त्यानं आश्रय घेतला. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत झाली. दहा दिवसांत कोरोनावर मात करून तो अगदी ठणठणीत बरा झाला.

मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासा

गेल्या काही दिवसांपासून देशातील जवळपास सर्वच राज्यांत ऑक्सिजनसाठी धावाधाव पाहायला मिळत आहे. पानीपतमधील नंगला गावचा रहिवासी असलेल्या प्रदीप सिंहला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यानंही ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. रुग्णालयांची अवस्था पाहून त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत घसरल्यावर प्रदीपसह त्याच्या नातेवाईकांनी सिलिंडरसाठी अनेकांना फोन केले. मात्र काही उपयोग झाला नाही.

ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यानं प्रदीप सिंह शेतात गेले. पुढील १० दिवस तो दररोज ८ ते १० तास झाडांखाली बसून असायचा. जेवणदेखील तो तिथेच घ्यायचा. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य झालं. हळूहळू त्याच्या छातीतील वेदनादेखील कमी झाल्या. श्वास घेण्यातील अडचणी दूर झाल्यानं प्रदीपला आत्मविश्वास वाटू लागला. त्यानं कोरोना चाचणी करून घेतली. १३ मे रोजी प्रदीपनं केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. अवघ्या १० दिवसांत निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रदीपनं कोरोनावर मात केली.

Read in English

Web Title: coronavirus news corona positive youth oxygen level fine in 3 days after he sits under trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.