CoronaVirus News: महाराष्ट्रासह सहा राज्यांत कोरोना स्थिती चिंताजनक; तिसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:36 AM2022-01-21T10:36:08+5:302022-01-21T10:37:00+5:30
५१५ जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर ५ टक्क्यांहून अधिक
नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेशमधील कोरोना स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूंचे तसेच प्रकृती चिंताजनक झालेल्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. व्यापक लसीकरणामुळे हा फायदा झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशातील ११ राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या प्रत्येकी ५० हजारांपेक्षा अधिक आहे.
देशातील प्रौढ व्यक्तींपैकी ९४ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ७२ टक्के जणांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यात येत आहे.
जगातील परिस्थिती
३४.६१ लाख : नवे रूग्ण
३३ कोटी ९७ लाख रुग्ण असून आजवर त्यातील ५५ लाख ८४ हजार जणांचा मृत्यू झाला.
जगामध्ये कोरोनाच्या आजारातून २७ कोटी ३२ लाख जण बरे झाले.
६ कोटींहून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत ६ कोटी ९८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी ४ कोटी ३८ लाख जण बरे झाले.