CoronaVirus News : खासगी लॅबमध्ये होणारी कोरोना चाचणी सदोष?, दोघांना कोरोना नसताना टेस्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:35 AM2020-05-21T02:35:45+5:302020-05-21T02:36:37+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : खासगी लॅबच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. अर्थात, आयसीएमआरच्या यादीत ही लॅब आहे. मात्र, सदोष पद्धतीमुळे दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
नवी दिल्ली : कोणत्याही कारणास्तव कोरोनाची चाचणी करण्याच्या विचारात आहात? थांबा. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, गुरूग्राममध्ये दोघांना कोविड-१९ ची लागण झाल्याचा अहवाल खासगी लॅबने दिला; मात्र नोएडाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बायोलॉजीमध्ये त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला.
खासगी लॅबच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. अर्थात, आयसीएमआरच्या यादीत ही लॅब आहे. मात्र, सदोष पद्धतीमुळे दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
अनुक्रमे ३७ व ४६ वर्षीय पुरुषांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. अर्थात सर्दी, खोकला, ताप असल्याने त्यांनी स्वत:च कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. आयसीएमआरने निश्चित केलेल्या लॅबशी संपर्क साधून त्यांनी चाचणी केली. त्यांना कोरोना असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्यावर पुन्हा त्यांचे नमुने घेण्यात आले व दुसऱ्याच दिवशी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. विशेष म्हणजे, एका खासगी कंपनीतील १८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील हे दोन्ही कर्मचारी पॅझिटिव्ह असल्याचे सांगितल्याने कंपनीत अस्वस्थता पसरली. इतर कर्मचारी घाबरले. दोघा कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. दुसºयाच दिवशीच्या चाचणीनंतर त्यांना खबरदारीसाठी होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. गोपनीयता व अकारण घबराट निर्माण होऊ नये म्हणून कंपनीचे नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली आहे.