CoronaVirus News : देशात कोरोना चाचण्या कमी; १० लाखांमागे फक्त २००७
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:34 AM2020-05-22T05:34:56+5:302020-05-22T05:35:01+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन दर दहा लाख लोकांमागे २.६४ मृत्यू असा दर २१ मे रोजी होता. जगात हा मृत्यू दर सगळ््यात कमी असावा. याशिवाय बाधित रुग्णांचे प्रमाणही युरोप, उत्तर अमेरिका, अफ्रिका आणि इतर देशांच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे सगळ्यात कमी ८६ एवढे आहे. असे असले तरी तज्ज्ञ काळजीत पडले आहेत ते म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे. येथे विकसित देशांचा विचार नाही.
एवढेच काय सगळे आफ्रिकन देश एकत्र केले तर त्यांनीही दर दहा लाख लोकांमागे २०८२ चाचण्या केल्या तर भारताने २१ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडील (आयसीएमआर) माहितीनुसारदर दहा लाख लोकांमागे चाचण्या केल्या २००७. २१ एप्रिल रोजी भारताने ४.६२ लाख चाचण्या केल्या होत्या तर एक महिन्यानंतर त्याच्या सहापट म्हणजे २६.१५ लाख चाचण्या केल्या.
कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.
अनेक राज्ये ही एक तर पुरेशा चाचण्या करत नाहीत किंवा माहिती लपवून ठेवतात ही तज्ज्ञांची काळजी आहे. चाचणीची व्यवस्था (सिस्टीम) ही खूप त्रासदायक व बोजड करण्यात आली आहे की, खासगी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना औपचारिकता पूर्ण करून चाचण्या घेणे खूप त्रासदायक झाले असे अहवाल सरकारकडे येत आहेत.
बºयाच खासगी प्रयोगशाळा त्यांच्या क्षमतेच्या फक्त २५ टक्के चाचण्या करत आहेत. दुसरे म्हणजे आयसीएमआरने रुग्णांची जर तयारी नसेल तर खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास मनाई केलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, आयसीएमआरच्या नोडल अधिकाऱ्यांकडून परवानगी आणि औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे निष्कर्षांना विलंब होत आहे.