CoronaVirus News: बलात्कार पीडिता कोरोना पॉझिटिव्ह; आरोपी तिहार जेलमध्ये असल्यानं उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:41 PM2020-05-11T15:41:32+5:302020-05-11T15:49:45+5:30
ही माहिती मिळताच त्या आरोपीसह दोघा कैद्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
नवी दिल्लीः बलात्कार पीडितेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी तिहार तुरुंगात आहे. आता बलात्कार पीडितेचा अहवालच पॉझिटिव्ह आल्यानं तिहार तुरुंगात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच त्या आरोपीसह दोघा कैद्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आता जेल प्रशासन त्या आरोपीच्या कोरोना टेस्टच्या अहवालाची वाट पाहत आहे.
बलात्कारातील हा आरोपी काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात आणला गेला होता. त्याला तुरुंग क्रमांक 2मध्ये ठेवले होते. 9 मे रोजी तिहार प्रशासनाला समजले की, आरोपी मुलाने ज्या मुलीवर बलात्कार केला आहे, तिला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती मिळताच तुरुंगात एकच खळबळ उडाली. तुरुंग प्रशासनाने लागलीच सतर्कता बाळगत आरोपीसह अटक करण्यात आलेल्या आणखी दोन कैद्यांची वैद्यकीय चाचणी घेतली. आता जेल प्रशासन त्या आरोपीसह दोन कैद्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आज कैद्याचा तपास अहवाल येऊ शकतो. कारागृह प्रशासनाने सामाजिक अंतर आणि इतर खबरदारी घेत असल्याचं सांगितलं आहे. तुरुंगात येणार्या प्रत्येक कैद्याचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. कारागृह प्रशासन त्यादृष्टीने प्रत्येक खबरदारीची पावलं उचलत आहे.
विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हासुद्धा तिहार तुरुंगातील क्रमांक दोनमध्ये बंद आहे. बिहारचे सीवानचे माजी खासदार आणि बाहुबली नेते शहाबुद्दीनसुद्धा या तुरुंगात आहेत. या दोघांपैकी कोणीही आरोपीच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यांचे सेल वेगळे असून, या आरोपीचे सेल वेगळे आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये रक्तदान करायचे आहे?; मग जाणून घ्या, कसा बनवतात ई-पास
Lockdown : पोस्टाच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई
CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली
Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!