CoronaVirus News: ५० हजारांची मदत, अडीच हजार पेन्शन; कोरोना संकटात केजरीवालांच्या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:14 PM2021-05-18T18:14:12+5:302021-05-18T18:15:14+5:30
CoronaVirus News: कोरोनाचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठी दिल्ली सरकारच्या महत्त्वपूर्ण घोषणा
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. मात्र दररोज दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यानं धोका कायम आहे. त्यामुळे दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रेशन दुकानांतून धान्य खरेदी करत असताना त्यांच्याकडून माफक रक्कम घेतली जायची. मात्र आता तसं होणार नाही. प्रत्येक कार्डधारकाला दर महिन्याला १० किलो मोफत धान्य मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
There are 72 lakh ration card holders in Delhi & they're given 5 kg ration by the govt every month. This month, ration will be given free of cost. Besides this, addl 5 kg free ration is being given by the Central Govt. So they're being given 10 kg free ration this month: Delhi CM pic.twitter.com/tNLqpMJxCa
— ANI (@ANI) May 18, 2021
काही व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही. मात्र अशा व्यक्तींना रेशनची आवश्यकता असेल, तर त्यांना रेशन मोफत दिलं जाईल. दिल्लीतील रेशन कार्डधारकांची संख्या ७२ लाख इतकी आहे. त्यांना सध्या केंद्राकडून ५ किलो धान्य मिळत आहे. आता त्यांना दिल्ली सरकारकडून ५ किलो धान्य मिळेल. त्यामुळे नागरिकांना महिन्याला १० किलो धान्य मिळेल. कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब अडचणींचा सामना करत आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन कोरोनामुळे झालं असल्यास त्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केजरीवालांनी केली.
Those who do not have ration card but are poor will also be given ration by Delhi Govt. They need not produce their income certificate, they just need to tell us that they are poor and they want ration: Delhi CM Arvind Kejriwal
— ANI (@ANI) May 18, 2021
कोरोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबासाठी दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 'कोरोनामुळे कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. याशिवाय त्या कुटुंबाला दर महिन्याला अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे. कोरोनामुळे आई वडील गमावणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या वयाची पंचविशी येईपर्यंत दर महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील. या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल,' असं केजरीवाल यांनी सांगितलं.