CoronaVirus News: 'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:47 AM2021-04-21T07:47:31+5:302021-04-21T07:50:42+5:30

CoronaVirus News: रुग्णालयात बेड मिळेना; रुग्णालयाबाहेर १०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका रांगेत उभ्या

CoronaVirus News in gujarats rajkot people take bed for covid 19 patient from house | CoronaVirus News: 'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला

CoronaVirus News: 'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला

Next

राजकोट: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. देशात दोन आठवड्यांपूर्वी सर्वप्रथम दिवसभरात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांतच हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. आता गेला आठवडाभर देशात दररोज कोरोनाच्या २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणं अवघड झालं आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमध्ये कोरोनामुळे स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.

राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन? जिल्हाबंदी; उद्धव ठाकरे घोषणा करणार

गुजरातमध्ये काल कोरोनानं सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीए. त्यामुळे रुग्णांना घरातूनच बेड आणावा लागत आहे. राजकोटमध्ये काल सकाळी सिव्हिल रुग्णालयाच्या जवळ असलेल्या चौधरी मैदानात १०० हून अधिक रुग्णवाहिका आणि खासगी वाहनं रांगेत उभी होती. रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्यानं रुग्णांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमध्ये वाट पाहावी लागत आहे.

देशव्यापी लॉकडाऊन नाही; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची उद्योग क्षेत्रास ग्वाही

राजकोटमध्ये कोरोनाचा कहर वाढला. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे. चौधरी शाळेच्या मैदानात अनेक रुग्ण बेड कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. काही नातेवाईकांनी त्यांना शक्य होईल तशी व्यवस्था करून रग्णावर उपचार करत आहेत. बराच वेळ वाट पाहूनही एका रुग्णाला बेड न मिळाल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी घरातून त्याच्यासाठी बेड आणला आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीनं त्याच्यावर उपचार करू लागले.  'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामध्ये अभिनेता संजय दत्त हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सगळं सामान घरून घेऊन येतो. तशीच काहीशी स्थिती गुजरातमध्ये दिसू लागली आहे.

राजकोटमधील आरोग्य यंत्रणाच सध्या व्हेंटिलेटवर आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिव्हिल रुग्णालयाबाहेर १०० हून अधिक रुग्णवाहिका उभ्या आहेत. कित्येक रुग्ण रात्रभर रुग्णवाहिकेतच आहेत. मात्र बेड शिल्लक नसल्यानं त्यांना रुग्णालयात घेतलं जात नाही. शहरात १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. पण कित्येक रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन रुग्णालयाबाहेर असलेल्या रांगेत उभ्या असल्यानं अनेक रुग्णांना खासगी वाहनांतून रुग्णालय गाठावं लागत आहे.

Web Title: CoronaVirus News in gujarats rajkot people take bed for covid 19 patient from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.