CoronaVirus News : कोरोनाच्या पहिल्या भारतीय लसीची मानवी चाचणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:47 AM2020-07-15T01:47:42+5:302020-07-15T06:56:18+5:30

कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता.

CoronaVirus News: Human testing of Corona's first Indian vaccine begins | CoronaVirus News : कोरोनाच्या पहिल्या भारतीय लसीची मानवी चाचणी सुरू

CoronaVirus News : कोरोनाच्या पहिल्या भारतीय लसीची मानवी चाचणी सुरू

Next

पाटणा : देशात कोरोनाने थैमान घातले असून बाधितांचा आकडा ९ लाखांवर पोहोचला आहे. मात्र, मृतांची संख्या कमी असल्याने काहीसा ताण कमी झाला आहे. आता पाटणावरून आणखी एक चांगली बातमी येत आहे. देशाच्या पहिल्या कोरोना लसीची माणसांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली असून एम्समध्ये प्रयोग सुरु आहेत.
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पाटणा एम्समध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या १० जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, असे आॅल इंडिया रेडिओने म्हटले आहे. यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरीक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर १४ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. या १० जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यावर होणारे चांगले- वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवडलेल्या १२ संस्थांपैकी पटनाचे एम्स एक आहे.

कोव्हॉक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी म्हणाले की, सार्स-कोव्ह-२ विषाणूविरोधात कोव्हॉक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक २०० दशलक्ष लसी बनविण्याच्या तयारीला लागली आहे. ही लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus News: Human testing of Corona's first Indian vaccine begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.