CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:56 PM2020-07-22T15:56:19+5:302020-07-22T15:56:48+5:30

'हर्ड इम्युनिटी' सुनिश्चित करण्यासाठी किमान 60 ते 70 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे.

CoronaVirus News : if corona vaccine get today india need at least 2 years to vaccinate | CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

Next

ऑक्सफोर्ड विद्यापीठ कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी तयारीत आहे. जगातील सर्व देशांप्रमाणेच कोरोना व्हायरस भारतातही सर्वत्र पसरतो आहे. त्यामुळे भारतातही कोरोना व्हायरसवर लस बनवण्याचे काम सुरू आहे. देशातील वैद्यकीय तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, ही लस लवकरच तयार केली गेली असली तरी भारतातील 60-70 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. 'हर्ड इम्युनिटी' सुनिश्चित करण्यासाठी किमान 60 ते 70 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे.

डिसेंबरपर्यंत आपल्याला लस मिळाली तर…
कोरोनावरील दिल्ली सरकारच्या पॅनेलचे सदस्य, मॅक्स हेल्थकेअरचे डॉक्टर संदीप बुधीराजा यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, "जर आपण दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले, तर आपल्याला 60 ते 70 टक्के लोकसंख्येची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जरी आम्हाला डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस मिळाली, तर भारतातील 60 टक्के लोकसंख्येपर्यंत लसीकरण करण्यासाठी एक ते अडीच वर्षे लागेल.'

...तर इतर आजारांप्रमाणे कोरोनाबरोबरही जगावं लागेल
बुधीराजाच्या मते, ज्याप्रमाणे आपण टीबीसारख्या आजाराशी झगडत जगलो, तसेच देशाला कोरोना व्हायरससोबत जगावे लागेल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, भारतात सार्वत्रिक लसीकरण आधीपासूनच एक मोठे आव्हान आहे. दिल्ली-एनसीआरमधील कोविड हॉस्पिटल चालवणारे आकाश हेल्थकेअरचे डॉक्टर आशिष चौधरी म्हणतात, "सरकारी अहवालानुसार, सर्व प्रयत्न करूनही त्या गटातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त लस 2 वर्षांखालील मुलांमध्ये अनिवार्य प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्यावी लागेल." .

वेगाने व्हायरस बदलतोय रूप, एक लस मुळीच प्रभावी ठरणार नाही
एकाच लशीबद्दलही शंका आहे, जी सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. टेलिमेडिसीनला भारतात एक नवीन ओळख देणारे अपोलो टेलिहेल्थचे गणपती म्हणतात, “डिसेंबर २०१९ ते जून २०२० पर्यंत या विषाणूनं रूप बदलले आहे. आता स्पेनमध्ये त्याचे रूप कसे होते, इटलीमध्ये त्याचे रूप कसे होते आणि भारतात त्याचे रूप कसे आहे यावरही बरंच काही अवलंबून असतं. आमची प्रतिकारशक्ती वेगळी आहे. '

कोविडच्या आता 6 ट्रेन्स, एकाच वेळी एक लस एका ट्रेन्सवर ठरेल प्रभावी
ही लस सर्वांना उपलब्ध असल्याबद्दल तज्ज्ञांना शंका आहे. डॉक्टर चौधरी म्हणतात, 'कोरोना विषाणूचे 6 प्रकार आहेत आणि एका वेळी केवळ एकाच ट्रेन्सविरुद्ध लस प्रभावी ठरेल. इतर स्ट्रेन्सच्या वापरासाठी लसमध्ये काही बदल आवश्यक आहेत. 20 वर्षांपूर्वी SARSवर अद्याप लस उपलब्ध नाही. कोरोना लस लवकरच तयार होईल की नाही, याची तज्ज्ञांना खात्री नाही. डॉ. गणपती म्हणतात, आमच्याकडे अद्याप सार्स विषाणूवरची लस तयार झालेली नाही, जी साथ 20 वर्षांपूर्वी प्रथम पसरली होती.

हेही वाचा

LICच्या 'या' योजनेवर मिळतेय 15 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त एकच अट!

CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

Web Title: CoronaVirus News : if corona vaccine get today india need at least 2 years to vaccinate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.