CoronaVirus News: देशातील ऑक्सिजनचा साठा गेला कुठे?; मोदी सरकारचा निर्णय पाहून तुम्हालाही धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:21 AM2021-04-21T10:21:24+5:302021-04-21T10:21:53+5:30
CoronaVirus News: देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा; ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात दोन आठवड्यांपूर्वी सर्वप्रथम दिवसभरात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांतच हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. आता गेला आठवडाभर देशात दररोज कोरोनाच्या २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताना दिसत नसल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.
तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कार
ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णाला ऑक्सिजन मिळावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. देशात ऑक्सिजनची टंचाई जाणवत असताना मोदी सरकारनं घेतलेला एक निर्णय समोर आला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये देशातून तब्बल ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला गेल्याचं वृत्त मनीकंट्रोल या वृत्त संकेतस्थळानं दिलं आहे.
'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला
वाणिज्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन देशाबाहेर पाठवण्यात गेल्या. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ हजार ५०२ मेट्रिक टन ऑक्सिजन देशाबाहेर पाठवला गेला होता. निर्यात करण्यात आलेला ऑक्सिजनचा साठा द्रवरुपात होता. त्याचा वापर औद्योगिक आणि वैद्यकीय कारणांसाठी केला जाऊ शकतो.
देशातीन निर्यात करण्यात आलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी ९५ टक्क्यांहून अधिकचा साठा एकट्या बांग्लादेशाला पाठवण्यात आला. बांगलादेशला तब्बल ८ हजार ८२८ मेट्रिक टन ऑक्सिजन भारताकडून देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश भारताकडून आयात करत असलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत गेलं. मात्र कोरोना संकट येताच बांगालदेशानं ऑक्सिजनची आयात वाढवली. सुरुवातीला बांगलादेशानं प्रामुख्यानं औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन मागवला. पण त्यानंतर बांगलादेश वैद्यकीय कारणांसाठी ऑक्सिजनची आयात करत आहे.