CoronaVirus News : कोरोना लस संशोधनासाठी भारत जगाला साकडे घालणार, आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:35 IST2020-11-04T01:00:30+5:302020-11-04T06:35:54+5:30
CoronaVirus News : देशांर्तगत लस विकसित करून आपली गरज भागल्यावर जगाच्या मदतीला भारत धावून जाईल. त्यासाठी जगभरातील औषध निर्माण कंपन्यांशी भारताने संवादाची तयारी केली आहे.

CoronaVirus News : कोरोना लस संशोधनासाठी भारत जगाला साकडे घालणार, आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी
नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आता लसीकरणासाठी भारताने आंतरराष्ट्रीय आरोग्य मुत्सद्देगिरीसाठी रणनीती ठरवण्याची तयारी केली आहे. देशांर्तगत लस विकसित करून आपली गरज भागल्यावर जगाच्या मदतीला भारत धावून जाईल. त्यासाठी जगभरातील औषध निर्माण कंपन्यांशी भारताने संवादाची तयारी केली आहे.
राजनैतिक स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जातील. जागतिक पटलावर औषध विकसित करणारा तसेच पुरवठादार देश म्हणून भारताचे स्थान भक्कम होण्याची परराष्ट्र विभागाला आशा आहे. येत्या ६ नोव्हेंबरला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला दिल्लीत विविध देशांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आफ्रिकन देशांमध्ये अनेक भारतीय संघटना काम करतात. त्यांच्याशीही परराष्ट्र मंत्रालयाने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या लसीच्या चाचणीवर भारतासह जगाचे लक्ष आहे. लोकसंख्येचा विचार करता ७० टक्के लोकांना लस द्यावी लागेल. एका व्यक्तीस दोन डोस द्यावे लागतील. त्यामुळे केवळ परदेशासह भारतातही सुरू असलेल्या संशोधनावरही लसीकरणाची मदार असेल.