CoronaVirus News : भारतात कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:20 AM2020-12-21T05:20:04+5:302020-12-21T05:21:06+5:30

CoronaVirus News in India : देशातील रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे.

CoronaVirus News: India is not likely to have another major wave of corona, medical experts say | CoronaVirus News : भारतात कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

CoronaVirus News : भारतात कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

Next

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही आणि समजा तशी लाट आलीच तर ती खूप गंभीर स्वरूपाची असणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काही वर्षांत कोरोना संसर्गाच्या छोट्या स्वरूपाच्या लाटा येत राहातील, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
देशातील रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतक्या रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही.

सलग सातव्या दिवशी नवे  रुग्ण ३० हजारांहून कमी
- देशामध्ये सलग सातव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा कमी आहे. 
- दररोजच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 
- कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ३१ हजार झाली असून त्यातील ९५ लाख ८० हजार लोक बरे झाले, ही दिलासा देणारी बाब आहे. 

अमेरिकेत एकाच दिवसात ४ लाख नवे रुग्ण
अमेरिकेमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. त्या देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ८० लाख झाली असून १ कोटी ५ लाख जण बरे झाले. वाढच्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. 

लंडनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून त्यामुळे नाताळच्या वेळेस बंधने शिथिल करण्याचा निर्णय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होते तसेच कडक स्वरूपाचे लॉकडाऊन आता लागू राहील.

लस उत्पादकांना संरक्षण देण्याची अदर पूनावाला यांची मागणी
कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचा खोटा दावा करणारे लोक व त्यांनी दाखल केलेल्या खटल्यांपासून लस उत्पादकांचे केंद्राने संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus News: India is not likely to have another major wave of corona, medical experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.