CoronaVirus News: अमेरिकन तज्ज्ञानं सांगितली भारताची 'ताकद'; कोरोना संकटात देशासाठी 'पॉझिटिव्ह' न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:58 PM2021-05-22T14:58:28+5:302021-05-22T14:59:27+5:30
CoronaVirus News: कोरोना महामारीच्या हाताळणीवरून पाश्चिमात्य देशांनी काही दिवसांपूर्वीच भारतावर टीका केली होती
नवी दिल्ली: कोरोना महामारीची हाताळणी चुकीच्या पद्धतीनं केल्याची टीका पाश्चिमात्य माध्यमांकडून गेल्या काही दिवसांपासून भारतावर करण्यात येत आहे. जगातील अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी भारतातील कोरोना स्थितीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर आता अमेरिकेन परराष्ट्र धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ते अरब न्यूजशी बोलत होते.
ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...
भारतातील राजकीय ढाचा स्थिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोन्हीही राजकीयदृष्ट्या अतिशय सुरक्षित आहेत. त्यामुळे बाकीच्या देशांना भारताबद्दल ईर्ष्या वाटते. भाजप आणि मोदी इतके सुरक्षित आहेत की इतर देश केवळ त्यांच्याबद्दल असुया बाळगू शकतात, असं मत हल्समन यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढल्याचा थेट परिणाम भारतातील आरोग्य यंत्रणेवर पाहायला मिळाला. आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली. त्यावरून पाश्चिमात्य माध्यमांनी भारतावर कडवी टीका केली. पण तरीही भारतातील राजकीय यंत्रणा पूर्णपणे स्थिर आहे. ती अजिबात डळमळीत झालेली नाही, असं हल्समन यांनी सांगितलं.
धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळ
भारतातील लोकसंख्येचं स्वरुप भारताचं बलस्थान असल्याचं हल्समन यांनी सांगितलं. 'भारतातील राजकीय यंत्रणा अतिशय मजबूत आहे. याशिवाय भारताला लोकसंख्येचादेखील फायदा मिळतो. २०२४ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनला मागे टाकलेलं असेल. भारताची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. तर ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या खाली आहे,' अशी आकडेवारी हल्समन यांनी सांगितली.
भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी खोटी नाही. २०५० पर्यंत संपूर्ण जगाच्या जीडीपीमध्ये भारताचं योगदान १५ टक्के असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११.५ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.