CoronaVirus News: देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 10:07 AM2021-05-01T10:07:02+5:302021-05-01T10:07:27+5:30

CoronaVirus News: देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा ३२ लाखांच्या पुढे; आतापर्यंत २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू

CoronaVirus News india reports 4 lakh new cases for the first time | CoronaVirus News: देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढ

CoronaVirus News: देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढ

Next

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.




देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला

गेल्या महिनाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
एप्रिलमध्ये कोरोनानं देशात वेगानं हातपाय पसरले आहेत. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर हा आकडा सातत्यानं वाढत गेला. १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आज म्हणजेच १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा वेग अक्षरश: धडकी भरवणारा आहे. मे महिन्याच्या मध्यात देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Web Title: CoronaVirus News india reports 4 lakh new cases for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.