CoronaVirus News : ५ हजार डॉक्टरांना लागण, महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:07 AM2020-08-19T05:07:26+5:302020-08-19T05:07:33+5:30

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

CoronaVirus News : Infection of 5,000 doctors, biggest threat to Maharashtra | CoronaVirus News : ५ हजार डॉक्टरांना लागण, महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

CoronaVirus News : ५ हजार डॉक्टरांना लागण, महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

Next

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : पाच हजार डॉक्टरांना देशभरात या जीवघेण्या रोगाने गाठले. त्यातील सर्वाधिक २० टक्के डॉक्टर्स महाराष्ट्रातील आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने महिनाभरÞापूर्वी ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यात किमान शंभर डॉक्टरांची भर आतापर्यंत पडली असण्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर महत्त्वाचा अशा आशयाचे विधान शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
आतापर्यंत १०० पेक्षा जास्त डॉक्टरांनी आपले प्राण कोरोनामुळे गमावले. त्यातील २० डॉक्टर्स महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे वय देखील पन्नाशीच्या आत होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या गावातदेखील डॉक्टर कोरोनाचा सामना करीत आहेत.
संजय राऊत यांचे विधान अत्यंत क्लेषदायक आहे. राऊत यांच्या हृदयावर कंपाउंडरने शस्त्रक्रिया केली? नाव सांगतील राऊत त्यांचे? असे खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले.

Web Title: CoronaVirus News : Infection of 5,000 doctors, biggest threat to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.