CoronaVirus News: इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी परतले; भारताचा मित्र लवकरच 'पॉझिटिव्ह' बातमी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:40 PM2020-08-07T23:40:09+5:302020-08-07T23:40:49+5:30
CoronaVirus News: इस्रायलच्या शास्त्रज्ञांचं मायदेशी प्रयाण; भारतात २० हजार जणांच्या कोरोना चाचण्यांचे नमुने गोळा केले
नवी दिल्ली: भारतीय शास्त्रज्ञांसोबत कोरोनाच्या रॅपिड चाचण्यांसंदर्भात संशोधन करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ आज मायदेशी परतलं. या शिष्टमंडळात इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्रालयातल्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. भारतामध्ये जमा करण्यात आलेल्या नमुन्यांचा अभ्यास करून इस्रायली शास्त्रज्ञ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कशा प्रकारे आटोक्यात आटोक्यात आणता येईल, याचा अभ्यास करणार आहेत. दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांनी २० हजारहून अधिक रुग्णांच्या चाचण्या करून नमुने गोळा केले आहेत. इस्रायल लवकरच रॅपिड चाचण्यांचं तंत्र विकसित करण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा भारताला होईल.
आम्ही यापुढेही भारतीय शास्त्रज्ञांसोबत विविध क्षेत्रांमध्ये एकत्र काम करू, अशी माहिती इस्रायलचे भारतातील राजदूत एच. ई. रॉन माल्का यांनी दिली. भारत आणि इस्रायलमधील सर्वोत्तम शास्त्रज्ञ यापुढेही सोबत काम करतील. कोरोना विषाणू विरुद्धचा लढा सुरूच राहील. मात्र इतरही क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम करू. दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचा फायदा जगाला होईल. या संकट काळातही भारत आणि इस्रायलचे संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास माल्का यांनी व्यक्त केला.