CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:19 AM2020-06-10T11:19:36+5:302020-06-10T11:30:23+5:30
CoronaVirus News : जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती.
चेन्नई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9985 नवीन रुग्ण आढळले असून 279 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनामुळे एका आमदाराचा मृत्यू झाला आहे.
डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जे. अनबालागन यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरू होते. जे. अनबालागन यांचा आजच 62वा वाढदिवस होता.
जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोरोना संकट काळात लोकांना मदत करण्यासाठी आमदार जे. अनबालागन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच, त्यांनी पक्षाच्या 'ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न' (Ondrinaivom Campaiagn) मध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. कोरोनामुळे एखाद्या आमदाराच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी जे. अनबालागन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
जे. अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. तसेच, जे. अनबालागन हे द्रविड मुन्नेत्र कड़गम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. टी नगर मतदार संघातून ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
आणखी बातम्या...
CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन
चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात
Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा