CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; IIT मधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:48 PM2021-03-31T14:48:14+5:302021-03-31T14:48:47+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या जोधपूर (Jodhpur) मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद ही जोधपूरमध्येच झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे. 25 जण पॉझिटीव्ह आढळल्याचं उघड होताच प्रशासनाने हा परिसर कटेंनमेंट झोन (Containment Zone) जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, शहरात 520 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 141 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या आकडेवारीवरुन शहरातील कोरोनाच्या वाढत्या स्पीडचा अंदाज येऊ शकेल.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे थैमान! देशात 1,62,468 लोकांना गमवावा लागला जीव https://t.co/1mhaJz4BlJ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021
कोरोना संक्रमणाचा शहरातील दर पुन्हा एकदा 27 टक्के झाला आहे. आयआयटीमधील 25 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आयआयटी ब्लॉक जी 3 मधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आता त्यांच्या फ्लॅटमध्येच राहतील. तसंच त्यांना पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येणार नाही. आयआयटी परिसरात बनवण्यात आलेले सुपर आयसोलेशन सेंटर देखील कंटेनमेंट झोनमध्येच आहे. जोधपूर शहरात एकूण 9 झोन आहेत. तर ग्रामीण भागात 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
CoronaVirus News : शाळा सुरू करणं पडू शकतं महागात, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतला निर्णय https://t.co/OgiNwFXhUx#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021
कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद
होळीच्या दिवशी दिवसभरात 214 जणांना कोरोनाची लागण झाली. जोधपूरमध्ये गेल्या 3 दिवसात 455 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
CoronaVirus News : धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारमध्ये कोरोनाचा उद्रेक, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढhttps://t.co/IJ4u7n1vn9#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#KumbhMela2021#KumbhHaridwar2021#Uttarakhand
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021