CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 09:31 AM2020-05-17T09:31:00+5:302020-05-17T09:35:24+5:30

पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. 

CoronaVirus News : lockdown 4 guidelines to be announced today amid vrd | CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी

CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, त्याप्रमाणे लॉकडाऊन -4ची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. पण यावेळी लॉकडाऊनचं स्वरूप थोडं वेगळं असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविला जाऊ शकतो. पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. 

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, त्याप्रमाणे लॉकडाऊन -4ची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. पण यावेळी लॉकडाऊनचं स्वरूप थोडं वेगळं असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविला जाऊ शकतो. पण लॉकडाऊन वाढवत असताना काही सेवांना सूटही देण्यात येऊ शकते. 

मोदी सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन 3 आज 17 मे रोजी संपत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवू शकते. ते 31 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येऊ शकते. लॉकडाऊनमध्ये कोणत्या सवलती मिळतील, याची माहिती सरकार लवकरच जाहीर करेल.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात वाहन, बस आणि कॅब सेवेस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण देखभाल क्षेत्रात  निर्बंध कायम राहतील. त्याच वेळी रेड झोन पुन्हा काही फेरबदल केले जातील. ई-कॉमर्स वेबसाइटला अनावश्यक वस्तू पुरवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आतापर्यंत जेथे फक्त 33 टक्के कर्मचार्‍यांना कार्यालये आणि कारखान्यांमध्ये काम करण्याची परवानगी होती, ती आता 50 टक्के केली जाऊ शकते.
शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन -4च्या निर्देशानुसार गृहमंत्री अमित शहा, गृहसचिव आणि पीएमओच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत 2 तासांपेक्षा जास्त वेळ बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा

Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी

 

Web Title: CoronaVirus News : lockdown 4 guidelines to be announced today amid vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.