CoronaVirus News : 'या' राज्यांतील लॉकडाऊन शिथिल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:47 PM2020-05-12T15:47:24+5:302020-05-12T15:57:26+5:30
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांकडून सतत केंद्र सरकारने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाऊन-३ येत्या १७ मे रोजी संपणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तविला जाता आहे की, ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्याच राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांकडून सतत केंद्र सरकारने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असलेल्या राज्यात आर्थिक हालचालींमध्ये वाढ होण्याची शकता आहे आणि लॉकडाऊनमध्येही मोठा दिलासा मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आपल्या भाषणात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही बोलतील. कारण, मजूर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक अडचणीत सापडले आहेत.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह झोनचा निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली. अनेक राज्यांनी स्वत: झोन निश्चित करण्याची मागणी केली होती. या बैठकीत 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक अॅक्टिव्हिटीज् वाढविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा पुढील टप्पा हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली जाण्याची शक्यता आहे.
गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, नागालँड या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या राज्यांतील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था बिघडली तर त्याचा परिणाम थेट केंद्रावर होईल, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात या राज्यांत सूट देऊन योजना शेअर करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिवाय चालणे अशक्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा कहर असा आहे की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक घेतले पाहिजे. त्याचबरोबर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन वाढविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. तामिळनाडूनेही रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यास असहमती दर्शविली आहे. राजस्थानमधून रेड झोनमध्ये पूर्ण बंदी घालण्याची सूचना देण्यात आली आहे. अशाप्रकारे, मोठ्या राज्यांची परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्यांमध्ये काही मोठ्या घोषणा करु शकतात.