CoronaVirus News: दिलासादायक! देशात नव्या रुग्णांचा ४६ दिवसांतील नीचांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:14 AM2021-05-31T07:14:20+5:302021-05-31T07:14:39+5:30
कोरोनाने बळी पडणाऱ्यांच्या संख्येतही घट
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रविवारी कोरोनाचे १ लाख ६५ हजार ५५३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ४६ दिवसांतील हा नीचांक आहे. याला बळी पडणारे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रविवारी ३४६० जण मरण पावले.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७८ लाख ९४ हजार ८०० असून, त्यातील २ कोटी ५४ लाख ५४ हजार ३२० जण बरे झाले. आतापर्यंत ३ लाख २५ हजार ९७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी कोरोनातून २ लाख ७६ हजार रुग्ण बरे झाले. देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रविवारी ती २१ लाख १४ हजार ५०८ होती. शनिवारी हीच संख्या २२ लाख २८ हजार ७२४ होती.
कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी या राज्यांसह इतर राज्यांनीही सध्या कडक लॉकडाऊन लागू केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही राज्यांत लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत.
६५% रुग्ण पाच राज्यांमध्ये तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक,
आंध्र प्रदेश या पाच राज्यांत देशातील
६५.३ टक्के काेराेना रुग्ण आहेत.