CoronaVirus News : कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; माजी मंत्र्याच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:00 PM2021-06-02T16:00:18+5:302021-06-02T16:09:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,83,07,832 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,788 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,207 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,35,102 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. माजी मंत्र्याच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी झाल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये कोरोना नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. विदिशातील सिरोंजमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. खरं तर मध्य प्रदेशमध्ये सध्या कोणत्याही व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त 10 लोकांनाच परवानगी आहे. मात्र माजी मंत्र्यांना निरोप देताना सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे नेते लक्ष्मीकांत शर्मा यांचं कोरोनामुळे निधन झालं. 11 मे रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. असं असताना कोरोना नियमावलीचं पालन केलं जात नाही. तसेच लोकांचा देखील हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घेतला तब्बल 594 डॉक्टर्सचा बळी #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#IMA#Doctorhttps://t.co/FE2SrETAh6
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021
अरे देवा! कोरोनात देवी कोपली म्हणत गावकऱ्यांची मोठी गर्दी
आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. देवी नाराज झाली, देवीचा कोप झाला असं म्हणत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं. सर्व नियम धाब्यावर बसवले. देवीला आनंदी करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी एकत्र आल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यात भक्तांनी देवीची प्रार्थना केली. देवीच्या कोपामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं असल्याने ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले होते. पूर्व गोदावरी भागाचे पोलीस अधीक्षक नयीम असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, ग्रामस्थांचा हा समज आहे की देवीचा कोप झाल्याने हे सर्व घडलं आहे. म्हणूनच देवीला खूश करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं.
CoronaVirus News : धक्कादायक! डॉक्टरला मारहाण करतानाचा Video जोरदार व्हायरल; 24 जणांना अटक#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/gBpZT9cE8b
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021