धक्कादायक! दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 02:26 PM2021-08-01T14:26:48+5:302021-08-01T14:35:41+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर दोन दिवसांनी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील एका 32 वर्षीय महिलेने दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला होता. मात्र प्रशासनाला माहिती मिळाली की महिलेचं कुटुंबीय सर्वांना लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचं कारण सांगत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार सुरू असताना तिचा मृतदेह हा पुन्हा एकदा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. आता शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत घातक; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा#Corona#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusPandemic#CoronaUpdates#DeltaVarianthttps://t.co/WRviyicMNu
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021
मटेवा गावच्या रहिवासी असलेल्या बबिता मालवीय यांनी 28 जुलै रोजी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. महिलेला खूप भीती वाटू लागली आणि ती खाली पडली. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. महिलेचं शवविच्छेदन करण्यात येणार असून यानंतर महिलेचा मृत्यू कोरोना लसीच्या साईड इफेक्टमुळे झालाय की आणखी काही कारणांमुळे याची माहिती मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही; लसीकरण झालेल्या लोकांनाही आहे धोका; रिसर्चमधून खुलासा#Corona#CoronaVirusUpdates#CoronavirusPandemic#coronavirus#DeltaVarianthttps://t.co/jr4PYD0yag
— Lokmat (@MiLOKMAT) July 31, 2021
कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.
CoronaVirus Live Updates : चिंताजनक! "वेळीच नियंत्रण मिळवा अन्यथा…"; कोरोनाच्या 'डेल्टा व्हेरिएंट'ने वाढवलं टेन्शन#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusPandemic#CoronaVaccine#WHOhttps://t.co/DcXzsgwdB3
— Lokmat (@MiLOKMAT) July 31, 2021