CoronaVirus News : ‘आरोग्यसेतू अॅप’ची सक्ती केली शिथिल; वापर करण्याचा सल्ला जिल्हाधिकारी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:51 AM2020-05-19T00:51:38+5:302020-05-19T06:15:25+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांचा मागोवा घेणे सुलभ व्हावे यासाठी हे अॅप सरकारने मुद्दाम विकसित केले आहे.
नवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शिकेत केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘आरोग्यसेतू अॅप’च्या बाबतीत भूमिका बदलली असून या मोबाईल अॅपचा वापर ऐच्छिक ठेवला आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांचा मागोवा घेणे सुलभ व्हावे यासाठी हे अॅप सरकारने मुद्दाम विकसित केले आहे. याआधी १ मे रोजी जारी केलेल्या मार्गदर्शिकेत सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घेणे व त्याचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले होते. सर्व कर्मचारी याचे पालन करतील याची जबाबदारी खातेप्रमुखावर टाकण्यात आली होती. या अॅपची सक्ती केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
प्रयत्न करावेत!
आता ताज्या मार्गदर्शिकेत भाषा एकदम मवाळ झाली आहे. आता सरकारने म्हटले आहे की, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्यांच्याकडे अनुरूप फोन आहेत असे सर्व कर्मचारी हे अॅप डाऊनलोड करतील यासाठी व्यवस्थापनाने आपल्यापरीने होतील तेवढे प्रयत्न करावेत. इतर नागरिकांनाही या अॅपचा वापर करण्याचा सल्ला जिल्हाधिकाºयंनी द्यावा, असे सरकारने म्हटले आहे.