CoronaVirus News : मास्क व ट्रिपल-टी उपायाने कोरोना लाट रोखणे शक्य, आरोग्य सचिव राजेश भूषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:01 AM2021-04-14T04:01:27+5:302021-04-14T07:20:48+5:30
CoronaVirus News: नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशात लसीकरण उत्सव साजरा होत आहे. देशात जवळपास ७१ हज़ार लसीकरण केंद्रांवर काम केले जात आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काळजी व्यक्त करताना आम्ही या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू, असे म्हटले. कोरोनाच्या या संघर्षात लोकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे, याशिवाय राज्यांनी चाचण्या, रुग्ण शोधणे आणि उपचारांसोबत कंटेनमेंट झोन बनवून कोविड-१९ अनुकूल वर्तनाबाबत जागरूकता केल्यास परिस्थितीत निश्चितच सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.
भूषण म्हणाले की, देशात लसीची टंचाई नाही. मोठ्या राज्यांना चार दिवस पुरेल एवढ्या लसीचा बॅकअप देऊन पुरवठा केला जातो.
भूषण म्हणाले की, ८९.५१ टक्के लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. एकूण नऊ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. ५३ जिल्ह्यांत केंद्रांची पथके जिल्हा प्रशासनासोबत काम करीत आहेत. जगात सर्वात जास्त लस भारतात दिली जात आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, केरळ, कर्नाटक राज्यांची आकडेवारी देऊन म्हटले की, या राज्यांत आरटीपीसीआर चाचण्या चाचण्या वाढवण्याचीही गरज आहे. त्यातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या, रुग्ण शोधणे आणि उपचार धोेरणावर योग्यरीत्या काम होऊ शकेल, असे ते म्हणाले.
नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशात लसीकरण उत्सव साजरा होत आहे. देशात जवळपास ७१ हज़ार लसीकरण केंद्रांवर काम केले जात आहे. भारताला स्पुटनिक ही तिसरी लस मिळाली आहे. स्पुटनिकची चाचणी ३० हज़ार लोकांवर झाली आहे.
कोरोना महामारीत जर कोणत्याही लसीला अमेरिका, जपान किंवा युरोपीय संघाच्या नियामकांकडून किंवा रेग्युलेटर्स किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली असेल तर तिला भारतात ट्रायलची गरज नाही. फक्त सात दिवस तिच्या परिणामांवर लक्ष ठेवले जाईल. जॉन्सन, फ्राइज़र, मॉडर्नालाही भारतात येण्याचे निमंत्रण दिले गेले आहे, असे पॉल म्हणाले.
रेमडेसिविरची टंचाई नाही
पॉल म्हणाले, ‘‘ रेमडेसिविरचा अभ्यास केला गेला. तिचा वापर घरी किंवा कमी लक्षण असल्यावर केला जाऊ नये. व्यक्तीच्या शरीरात प्राणवायुची कमी आणि डॉक्टरांचा सल्ला असल्यावरच तिचा वापर केला पाहिजे. देशात रेमडेसिविरची टंचाई नाही. लोकांनी टंचाई आहे असा प्रचार करू नये. जर सगळ्यांनी मास्क वापरला तर कोरोनाची लाट रोखता येईल, असेही ते म्हणाले.