CoronaVirus News : बोर्ड परीक्षांच्या वेळी विद्यार्थी, शिक्षकांना मास्क अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:20 AM2020-05-21T02:20:09+5:302020-05-21T02:20:26+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) आणि राज्यांच्या थांबलेल्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी सीबीएसई आणि राज्यांच्या मागणीवरून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे आदेश बुधवारी जारी केले.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : बोर्डाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांनाही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मास्क वापरावे लागतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) आणि राज्यांच्या थांबलेल्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी सीबीएसई आणि राज्यांच्या मागणीवरून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे आदेश बुधवारी जारी केले. त्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे सांगण्यात आले आहे की, बोर्ड परीक्षा समोर ठेवून विशेष बसेसची व्यवस्था केली जावी. सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, राज्यांना हे सांगण्यात आले आहे की, बोर्ड परीक्षा देणाऱ्यांसाठी त्यांनी बसेसची व्यवस्था करावी. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन व्हावे व विद्यार्थ्यांचीही गैरसोय होऊ नये. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार शाळा आणि राज्यांचे शिक्षण संचालनालयांना आदेश दिले जातील.
कंटेन्मेंट झोन्समध्ये सीबीएसई परीक्षेचे एकही केंद्र असणार नाही, असे सीबीएसईच्या अधिकाºयाने गृहमंत्रालयाच्या आदेशात असल्याचे सांगितले.