CoronaVirus News : एनसीईआरटी शालेय शिक्षणात बदलाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:16 AM2020-06-25T04:16:18+5:302020-06-25T06:53:00+5:30
एनसीईआरटी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांत बदल करील. याचा अंतरिम अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत मंत्रालयाला सोपवला जाईल.
एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाच्या दिवसांत शालेय शिक्षण व्हर्च्युअल मार्गाने चालत आहे आणि शाळा कधी सुरू होतील याबद्दल संभ्रम असताना केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) आदेश दिला की, तिने शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ साठी लर्निंग आऊटकमचे नवे मॉडेल तयार करावे. याशिवाय शिक्षणाचा नवा रोडमॅप तयार करण्यासाठी शालेय शिक्षणासाठी नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रमावर (एनसीएफ) काम सुरू केले जावे. एनसीईआरटी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांत बदल करील. याचा अंतरिम अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत मंत्रालयाला सोपवला जाईल.
केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोेखरियाल निशंक यांनी एनसीईआरटीला आदेश दिले की, अभ्यासक्रमात कपात करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, महत्त्वाचा अभ्यास वगळला जाऊ नये आणि पुस्तकांत ज्ञानवर्धक साहित्य कमी असू नये. याशिवाय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांत रचनात्मक विचार, जीवनकौशल्य, भारतीय लोकाचार आणि सभ्यता, कला इत्यादींचा त्यात समावेश असावा. निशंक म्हणाले, आम्हाला पूर्ण खात्री आहे की, कोरोना संकटाला ज्या प्रकारे आम्ही एका संधीत रूपांतरित केले त्याच प्रकारे पुढेही आम्ही सगळे मिळून भारतीय शिक्षण प्रणालीला नवे रूप देऊ. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा मार्च २०२१ पर्यंत तयार होईल आणि एनसीईआरटीने पाठ्यपुस्तकांच्या लेआऊटचे आणि डिझाईनचे काम सुरू केले आहे. सगळी नवी पाठ्यपुस्तके नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार असतील. नवा पाठ्यक्रमाचा रोडमॅप आत्मनिर्भर भारतांतर्गत मूलभूत साक्षरता, संख्यात्मकता मिशन आणि परिणाम आधारित समग्र शिक्षणावर आधारित आहे.
>एनसीईआरटीला लर्निंग आऊटकमसाठी सूचना
वर्ग १ ते ५ वीपर्यंत आॅक्टोबर २०२० पर्यंत आणि वर्ग ६ ते १२ वीपर्यंत लर्निंग आऊटकम समजावून सांगताना इन्फोग्राफिक्स/पोस्टर्स/सादरीकरण तयार करायचे आहेत.वर्ग १ ते ५ वीच्या शिक्षकांसाठी आॅनलाईन टीचर ट्रेनिंग कोर्स टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जावा आणि वर्ग ६ ते १२ वीच्या शिक्षकांसाठी ट्रेनिंग कोर्स टप्प्याटप्प्याने जून २०२१ पर्यंत पूर्ण केला जावा.वर्ग १ ते ५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२० पर्यंत पर्यायी शैक्षणिक साहित्य ज्या मुलांकडे आॅनलाईन शिक्षणाची कोणतीही सोय नाही त्यांच्यासाठी तयार केले जावे. याच प्रकारे वर्ग सहावी ते बारावीसाठी हे साहित्य टप्प्याटप्प्याने जून २०२१ पर्यंत तयार करायचे आहे. प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक विषयाच्या लर्निंग आऊटकमच्या मूल्यांकनासाठी कौशल्याने दोन स्तरांवर कमीतकमी दहा प्रश्न वर्ग एक ते पाचवीपर्यंत नोव्हेंबर २०२० पर्यंत आणि राहिलेल्या वर्गांसाठी मार्च २०२१ पर्यंत बनवायचे आहेत.एनसीईआरटी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पीएम ई-विद्यासाठी वर्ग एक ते बारावीसाठी स्वयंप्रभा वाहिन्यांसाठी (एक वर्ग, एक वाहिनी-चॅनल) साहित्य तयार करील आणि आॅगस्ट २०२० पर्यंत सगळ्या वाहिन्या सुरू करतील.