CoronaVirus News: चिंताजनक! लक्षणीय लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात; आरोग्य मंत्रालयानं सांगितला धोका
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 08:37 PM2020-09-29T20:37:59+5:302020-09-29T20:40:39+5:30
देशाला असलेला कोरोनाचा वाढता धोका कायम; आरोग्य मंत्रालय आणि आयसीएंमआरची माहिती
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असून अद्यापही धोका टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसून येत होतं. मात्र आरोग्य मंत्रालयानं देशातल्या जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी आरोग्य क्षेत्राशी संबंधित संघटना, जागतिक तज्ज्ञांनीदेखील धोका कायम असल्याचा इशारा दिला होता.
देशातील मोठी लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचं आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. यासाठी आरोग्य मंत्रालयानं सीरो सर्व्हेचा आधार घेतला. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं, वारंवार हात धुण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं.
As per ICMR’s (Indian Council of Medical Research) second national serosurvey report, one in 15 individuals aged more than 10 years were estimated to be exposed to #COVID19 by August 2020: Balram Bhargava, DG, ICMR pic.twitter.com/mnVanY4sRt
— ANI (@ANI) September 29, 2020
यावेळी आरोग्य मंत्रालयानं काही आकडेवारी सांगितली. 'देशात आतापर्यंत ५१ लाखांपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८३ टक्के इतकं आहे. कोरोना रुग्ण लवकर आढळून यावेत आणि त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दर १० लाख नागरिकांमागे ५२ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.
Since a large portion of the population is yet susceptible, prevention fatigue is to be avoided and 5T strategy (Test, Track, Trace, Treat & Technology) is to be adhered to: Balram Bhargava, DG, ICMR https://t.co/NCblHCFm0Mpic.twitter.com/YiL6bKf5CC
— ANI (@ANI) September 29, 2020
देशात आतापर्यंत ६१ लाख ६५ हजार २९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातल्या ५१ लाख १ हजार जणांनी कोरोनावर मात केली. तर ९६ हजार ३१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ओडिशामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं असून आसाममधील रुग्ण वाढीचा वेग किंचित कमी झाली आहे.