CoronaVirus News : ‘फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:18 AM2020-07-17T01:18:53+5:302020-07-17T01:19:32+5:30
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. हा विषाणू गरीब व श्रीमंत असा भेद करत नाही. ना तो कोणत्याही धर्म व पंथात भेदभाव करतो. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत यापुढे प्रचंड वाढ होणार आहे.
चित्रदूर्ग : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे आता आपल्याला फक्त देवच वाचवू शकेल असे अजब वक्तव्य त्या राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे. हे मंत्रीमहोदय राज्याच्या कोरोना नियंत्रण कृती गटाचेही प्रमुख आहेत.
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजारहून अधिक झाली असून बळींचा आकडाही ९००पेक्षा जास्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर बी. श्रीरामुलू म्हणाले की, जगभरातच कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही साथ रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्व प्रकारची उपाययोजना केली आहे.
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. हा विषाणू गरीब व श्रीमंत असा भेद करत नाही. ना तो कोणत्याही धर्म व पंथात भेदभाव करतो. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत यापुढे प्रचंड वाढ होणार आहे.
ते म्हणाले की, सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे, मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे किंवा त्यांच्यात नसलेल्या धोरणविषयक समन्वयामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे असा आरोप कोणीही करू शकतो. मात्र खरेतर ही स्थिती कोणाच्याही हातात राहिलेली नाही.