CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:48 AM2020-06-24T05:48:55+5:302020-06-24T05:49:23+5:30

हे औषध सात दिवसांत सर्व पतंजलीच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, असे जाहीर करण्यात आले.

CoronaVirus News : Patanjali's Ayurvedic medicine claims to be a panacea on Corona | CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा

CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा

googlenewsNext

डेहराडून : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या ‘कोविड-१९’ या आजारावर ‘अत्यंत गुणकारी’ आयुर्वेदिक औषध बाजारात आणल्याची घोषणा ऋषिकेश येथील पतंजली योगपीठ या कंपनीने मंगळवारी केली. हे औषध सात दिवसांत सर्व पतंजलीच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, असे जाहीर करण्यात आले.
योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला की, ‘कोरोनिल‘व ‘श्वासारी’ नावाच्या या औषधांनी रुग्णाची केवळ रोगप्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर त्याचा ‘कोविड-१९’ आजारही त्याने हमखास बरा होतो. या औषधाने कोविड-१९’चे रुग्ण तीन ते सात दिवसांत पूर्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर घेतलेल्या (पान ९ वर)(पान १ वरून) चाचण्यांमध्ये या औषधाने नक्की गुण येतो हे १०० टक्के सिद्ध झाले. जग या महामारीशी लढत असताना हे औषध उपलब्ध करून देताना अतिशय आनंद होत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले. या औषधात पिपली, अश्वगंधा, तुळस, काळी मिरी, काकडशिंगी, दालचिनी हे घटक आहेत.
या औषधांसह कंपनीने कोरोना किट तयार केले आहे. ५४५ रुपये किंमतीचे हे किट ३० दिवसांच्या उपचारांसाठी आहे. आचार्य बालकृष्णन म्हणाले की, देशभरातील सर्व पतंजली स्टोअर्समध्ये येत्या आठवडाभरात हे किट विक्रीसाठी उपलब्ध होईल. लोकांना आॅनलाईन मागणी नोंदवून घरपोच औषध मागविता यावे यासाठी एक अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपही विकसित करण्यात येत आहे.
बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीचे स्वत:चे संशोधन केंद्र व निझाम इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस यांनी मिळून हे औषध विकसित केले आहे. दिल्ली व अहमदाबाद या शहरांत या औषधांच्या कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वप्रथम चाचण्या घेण्यात आल्या. त्यात २८० रुग्ण पूर्ण बरे झाले. औषधांमुळे कोणतीही गुंतागुंत निर्माण झाली नाही व मुख्य म्हणजे सर्वांचे मृत्यू टळले. (वृत्तसंस्था)
>औषधाची जाहिरात
करण्यास मनाई
परंतु केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजली कंपनीस याची जाहिरात करण्यास मनाई केली. या औषधाला १९५४ चा चमत्कारी औषधांच्या जाहिरातीस प्रतिबंध करणारा कायदा लागू होत असल्याने हे औषध या कायद्याच्या कक्षेत बसणारे आहे वा नाही याची शहानिशा होईपर्यंत याची जाहिरात करू नये, असे मंत्रलयाने म्हटले आहे.

Web Title: CoronaVirus News : Patanjali's Ayurvedic medicine claims to be a panacea on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.