CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णालयात बेड मिळेना; कोरोना रुग्णांना झोपावं लागतंय रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:53 PM2021-04-23T13:53:09+5:302021-04-23T13:57:20+5:30

CoronaVirus News: कोरोना रुग्णालयं फुल झाल्यानं परिस्थिती गंभीर; रुग्णांना बेड मिळेना

coronavirus news patients seen sleeping on footpath outside brims hospital in karnataka | CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णालयात बेड मिळेना; कोरोना रुग्णांना झोपावं लागतंय रस्त्यावर

CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णालयात बेड मिळेना; कोरोना रुग्णांना झोपावं लागतंय रस्त्यावर

googlenewsNext

बिदर: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग अक्षरश: धडकी भरवणारा आहे. देशात ५ एप्रिलला सर्वप्रथम १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात ३ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कर्नाटकच्या बिदरमध्ये तर कोरोना रुग्णांना रुग्णालयाबाहेर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. 

ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! सर गंगाराम रुग्णालयात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 60 रुग्णांचा जीव धोक्यात

कर्नाटकच्या बिदरमध्ये असलेल्या रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांवर रुग्णालयाबाहेर असलेल्या जागेत, फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. बिदर इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील स्थिती अतिशय बिकट असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितलं.

कोरोनाबाधितामध्ये सर्वप्रथम दिसते हे लक्षण, विषाणू हळूहळू शरीरावर असा करतो हल्ला, वेळीच व्हा सावध

बुधवारी बिदरमध्ये कोरोनाचे २०२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १४ हजारांच्या पुढे गेला. गेल्या २४ तासांत बिदरमध्ये ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 'बिदर इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जिल्ह्यातलं सर्वात मोठं रुग्णालय आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्यानं बेड्स अपुरे पडू लागले आहेत. बेड्सची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत', अशी माहिती आरोग्यमंत्री सुधाकर यांनी दिली आहे.

Web Title: coronavirus news patients seen sleeping on footpath outside brims hospital in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.