CoronaVirus News : दिल्लीतील ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार, केंद्राची मात्र मान्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:56 AM2020-06-23T03:56:54+5:302020-06-23T06:58:23+5:30

CoronaVirus News : दिल्ली सरकारने ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचाराचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु केंद्र सरकारची या उपचार पद्धतीला मान्यता नाही.

CoronaVirus News : Plasma treatment for 400 patients in Delhi, however, is not approved by the center | CoronaVirus News : दिल्लीतील ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार, केंद्राची मात्र मान्यता नाही

CoronaVirus News : दिल्लीतील ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार, केंद्राची मात्र मान्यता नाही

Next

विकास झाडे
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची बाधा झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर प्लाझ्मा उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंगळवारपर्यंत (दि. २३) ते अतिदक्षता कक्षातून बाहेर येतील. जैन यांच्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचे निष्कर्ष आल्याने दिल्ली सरकारने ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचाराचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु केंद्र सरकारची या उपचार पद्धतीला मान्यता नाही.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनानंतर तबलिगी जमातशी संबंधित ३०० रुग्ण दुरुस्त झाल्यानंतर त्यांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शवली होती. काहींंनी रक्तदानही केले होते. जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा पद्धती अन्य उपचाराप्रमाणेच उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले होते. केजरीवालांच्या आवाहनानंतर आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी ही पद्धती हा केवळ प्रयोग असून, ती उपचाराची पद्धत होऊ शकत नाही. भारतात रुग्णांवर सरसकट प्लाझ्मा उपचारासाठी मान्यता नाही. रुग्णांच्या जिवास प्लाझ्मा उपचारामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा खुलासा केला होता. केंद्राच्या या भूमिकेमुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणत्याही राज्यास प्लाझ्मा उपचारपद्धतीसाठी क्लिनिकल ट्रायलची परवानगी दिली नाही.
सत्येंद्र जैन यांना श्वास घेणेही अवघड होते. पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येण्याआधीच त्यांना आॅक्सिजन द्यावे लागले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिॅटी हॉस्पिटलमधून शुक्रवारी मॅक्स या खासगी रुग्णालयात हलविण्यात
आले. त्याच रात्री त्यांच्यावर डॉ. संदीप बुद्धिराजा यांनी प्लाझ्मा उपचार
केले. शनिवारपासून जैन यांना ताप
नाही आणि त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रूग्णांना वाचविण्यास प्राथमिकता
हा प्रयोग जीवघेणा ठरू शकतो, असे केंद्राने सांगितले असले तरी सत्येंद्र जैन यांच्यावर यशस्वी उपचारानंतर दिल्ली सरकारने ४०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार सुरू केले आहेत. ‘लोकमत’शी बोलताना दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आमदार राघव चढ्ढा म्हणाले, ‘‘रुग्णांना वाचविण्यास आमची प्राथमिकता आहे. अशा प्रसंगी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर प्लाझ्मा उपचार हा देशातील पहिला मोठा प्रयोग आहे.’’
अवयव निकामी होण्यापूर्वी प्लाझ्मा उपचार
विषाणू शरीरात जाणे, फुप्फुसांना इजा आणि त्यानंतर अवयव निकामी होणे या ३ फेजमधून रुग्णाला जावे लागते. प्लाझ्मा उपचारपद्धतीचा प्रयोग केल्यास अवयव निकामी होण्यापासून वाचू शकतात, अशी माहिती डॉ. एस. के. सरीन यांनी दिली. ‘कोविड-१९’ या रोगासंदर्भात उपाययोजनांसाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे ते प्रमुख होते.

Web Title: CoronaVirus News : Plasma treatment for 400 patients in Delhi, however, is not approved by the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.