CoronaVirus News: शरीरात जाताच कोरोनावर वार; '2-डीजी' औषधाच्या पाकिटाची किंमत ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:24 PM2021-05-28T13:24:20+5:302021-05-28T13:57:08+5:30
CoronaVirus News: Price of Drdo 2dg anti Covid drug fixed at rs 990 २ डीजी औषधाची निर्मिती डॉ. रेड्डीजकडून; डीआरडीओकडून संशोधन.
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक कमी होत आहे. मात्र दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवू लागली. यामुळे देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षण संशोधन विकास संस्थेनं (डीआरडीओ) DRDO २ डीजी औषधाची निर्मिती केली. डॉ. रेड्डीज लॅबकडून या औषधाचं उत्पादन केलं जाणार आहे. या औषधाच्या एका पाकिटाची किंमत ९९० रुपये इतकी असेल. याबद्दलची घोषणा थोड्याच वेळापूर्वी करण्यात आली. CoronaVirus News: Price of Drdo 2dg anti Covid drug fixed at rs 990
The price of DRDO’s 2DG anti-COVID 19 drug has been kept at Rs 990 per sachet by Dr Reddy’s lab. Govt hospitals, central and state govt would be provided the medicine at a discounted price: Govt officials pic.twitter.com/FEic70fSq5
— ANI (@ANI) May 28, 2021
डीआरडीओनं विकसित केलेलं २ डीजी औषध डॉ. रेड्डीज लॅबकडून तयार केलं जाणार आहे. औषधाच्या एका पाकिटाची किंमत ९९० रुपये आहे. मात्र कंपनी हे औषध सरकारी रुग्णालयानं, केंद्र आणि राज्य सरकारांना सवलतीच्या दरात देईल. डॉ. रेड्डीज लॅबकडून २ डीजी औषधाची सेकंड बॅच तयार करण्यात आली आहे. यामध्ये औषधाची १० हजार पाकिटं आहेत. आता या औषधाची व्यवसायिक विक्री केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या
कोरोना रुग्णांच्या उपचारांत २ डीजीचा वापर करण्यास मे महिन्याच्या सुरुवातीला डीजीसीआयनं परवानगी दिली. २ डीजीच्या वापरामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज कमी भासते. त्यांना रुग्णालयात कमी दिवस उपचार घ्यावे लागतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात ऑक्सिजनची खूप मोठी कमतरता निर्माण झाली. देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे, हवाई दलाचा वापर केला गेला. त्याचवेळी २ डीजी औषध लॉन्च करण्यात आलं.
२ डीजीचे स्वरूप... (How 2dg works on Corona)
2 डीजी हे औषध 2डीजी अणूचे परिवर्तीत रुप आहे. जे ट्युमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचारासाठी वापरले जाते. चाचणीमध्ये 2 डीजी कोरोना रुग्णांवर परिणामकारक असल्याचे समोर आले. तसेच हे औषध हॉस्पिटलाईज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनवरील अवलंबित्वदेखील कमी करते.
कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिअंटला रोखणार?
INMAS चे संचालक डॉ. अनिल मिश्रा यांच्यानुसार 2 डीजी हे औषध आपलीच कॉपी बनविणाऱ्या व्हायरसला पकडते. व्हायरसचा कोणताही व्हेरिअंट असुदे त्याला भूक लागते. ही भूक शमविण्यासाठी तो पुढे येईल तेव्हा 2डीजी औषध त्याला जखडेल. व्हायरस वेगाने वाढू लागल्याने रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासू लागते. मात्र, हे औषध व्हायरसला वाढण्यापासून रोखत असल्याने आपोआपच रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही.
किती डोस घ्यायचा? (2 dg medicine dose)
एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ओआरएस जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी हे औषध 5-7 दिवस घ्यावे लागणार आहे, असे डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले.
२ डीजीचे साईडइफेक्ट काय आहेत? (2 dg medicine side effect)
चाचणीवेळी सामान्य कोरोनाबाधित आणि गंभीर रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, सर्व रुग्णांना याचा फायदा झाला. सर्वांमध्ये अनुकूल प्रभाव दिसला.