CoronaVirus News : "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"; खासदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:46 AM2021-06-04T11:46:29+5:302021-06-04T11:57:11+5:30

CoronaVirus And Shafiqur Rahman Barq : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे

CoronaVirus News shafiqur rahman barq controversial statement said corona not disease | CoronaVirus News : "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"; खासदाराचं वादग्रस्त विधान

CoronaVirus News : "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"; खासदाराचं वादग्रस्त विधान

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे (Corona Virus) आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत. तसेच अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी एका खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. 

"कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट" असं वादग्रस्त विधान सपा खासदाराने केलं आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं विधान केलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीती उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल असं शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलं आहे. 

"कोरोनाचे संकट हे भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट"

शफीकुर्रहमान बर्क यांनी यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलींना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे कोरोनासारखं मोठं संकट देशात आलं आहे. मी गेल्याच वर्षी कोरोना हा काही आजार नसल्याचं म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर उपाय असता, पण असं कोरोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा कोरोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे. 

"आम्ही मुस्लिमांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत" असंही शफीकुर्रहमान यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान  अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

Read in English

Web Title: CoronaVirus News shafiqur rahman barq controversial statement said corona not disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.