CoronaVirus News: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, ठाणे, चेन्नईतील स्थिती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:15 AM2020-05-30T00:15:36+5:302020-05-30T06:14:10+5:30
मृत्यू व बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असूनही काळजी
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची बाधा झालेले सर्वाधिकरुग्ण ज्या ११ शहरांत समोर आले त्यापैकी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, ठाणे आणि चेन्नईतील स्थिती बरे होणाºया रुग्णांची जास्त संख्या आणि कमी मृत्यूदर असूनही मोठ्या संख्येने येत असलेल्या रुग्णांमुळे आता चिंताजनक बनली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘बाधितांची वेगाने वाढत चाललेली संख्या हेच याचे मुख्य कारण असू शकते. रोज जास्त संख्येत रुग्ण तयार होत असल्यामुळे बरे होणाऱ्यांचा दर आपोआपच खाली येतो.’’ कोरोना आकडेवारीनुसार विषाणू बाधितांच्या सगळ्यात जास्त संख्येत तिसºया पायरीवर असलेल्या चेन्नईत मृत्यूदर सगळ्यात कमी आहे. येथे १२ हजार ७६१ रुग्णांत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. टक्केवारीत १०० रुग्णांमागे एकापेक्षाही कमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात हाच दर १.८८, हैदराबादेत १.८९, दिल्लीत १.९ आणि मुंबईत ३.१९ टक्के आहे.
11 शहरांत रुग्ण बरे होण्याचा सगळ्यात कमी दर हा मुंबईत २४.३७ टक्के आहे. 35,485 बाधितांपैकी मुंबईत फक्त ८६५० रुग्ण बरे झाले. हैदराबादमध्ये १०० रुग्णांमागे २५, ठाण्यात २८, कोलकातात ४१ पेक्षा जास्त आणि दिल्लीत ४६ पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.