CoronaVirus News :...तर दिल्लीत 31 जुलैपर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होईल - सिसोदिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:46 PM2020-06-09T13:46:20+5:302020-06-09T13:55:47+5:30

CoronaVirus News : आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि कोरोना रोखण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल.

CoronaVirus News :... so more than 5 lakh people will be infected with corona in Delhi by July 31 - Sisodia | CoronaVirus News :...तर दिल्लीत 31 जुलैपर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होईल - सिसोदिया

CoronaVirus News :...तर दिल्लीत 31 जुलैपर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होईल - सिसोदिया

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या समुदाय संसर्गाच्या धोक्याबद्दल मंगळवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वात डीडीएमएची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या समुदाय संसर्गाच्या धोक्याबद्दल मंगळवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वात डीडीएमएची बैठक झाली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. यावेळी सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत जशी वाढ होते आहे. तशीच राहिल्यास 31 जुलैपर्यंत पाच लाखाहून अधिक कोरोना केसस होतील, असे मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील रुग्णालये सर्व रूग्णांसाठी उघडण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आणि उपराज्यपालांना विचारले की दिल्ली सरकारचा निर्णय का रद्द केला गेला. यावर उपराज्यपाल यांना कोणतेही उत्तर देता आले नाही, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या बैठकीनंतर सांगितले.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, "उपराज्यपालांच्या निर्णयामुळे दिल्लीकरांसमोर संकट उभे राहिले आहे. ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, त्यावरून असे दिसते की 30 जूनपर्यंत 15 हजार बेडची आवश्यकता भासेल आणि 31 जुलैपर्यंत 80 हजार बेड्स लागतील. तसेच, 31 जुलैपर्यंत 5 लाखाहून अधिक कोरोना केसेस होऊ शकतील."

आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि कोरोना रोखण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे नेते या बैठकीत उपस्थित राहू शकतात.

दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता की, दिल्लीतील सरकारी किंवा खाजगी रुग्णालये असोत, त्याठिकाणी फक्त दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. तसेच, दिल्लीबाहेरील लोकांवर फक्त केंद्राच्या रुग्णालयात उपचार केले जातील. मात्र, दिल्ली सरकारच्या या निर्णयाला उपराज्यपालांनी स्थगिती दिली आहे.

आणखी बातम्या...

पॉर्न साइट्सवर विकायचा प्रेयसीचे अश्लील फोटो; एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरला अटक

"भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?"

CoronaVirus News : 'हा' देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स!

सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं    

ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!

Web Title: CoronaVirus News :... so more than 5 lakh people will be infected with corona in Delhi by July 31 - Sisodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.