CoronaVirus News: तज्ज्ञ डॉक्टरांना दिवसाला मिळणार १० हजार रुपये; 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:16 PM2021-05-06T18:16:08+5:302021-05-06T18:16:25+5:30
CoronaVirus News: कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू; लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या घटेना
चंदिगढ: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे. हरयाणात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यातील आरोग्य सोयी सुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे हरयाणा सरकारनं काही तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या डॉक्टरांना दररोज १० हजार रुपये वेतन देण्यात येईल. कोरोना संकटात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर तासाला १ हजार २०० रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार
हरयाणातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार काही साथरोग तज्ज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) अंतर्गत तज्ज्ञांची भरती करणार आहे. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरती
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप तरी राज्यातील कोरोनाचा कहर थांबलेला नाही. राज्यात लॉकडाऊन लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट लॉकडाऊनमध्ये ती अधिक वाढत आहे. राज्यातील संक्रमणाचा दर ७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७९.१० टक्के इतकं आहे. राज्यातील मृत्यूदर ०.८८ टक्के इतका आहे.