CoronaVirus News: मोदीजी, 'त्या' देशासोबतची हवाई वाहतूक लगेच रोखा; केजरीवालांनी सांगितला पुढचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:46 PM2021-05-18T16:46:55+5:302021-05-18T16:47:48+5:30
CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असून तिचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सिंगापूरहून येणारी आणि सिंगापूरला जाणारी विमानं रोखा, अशी मागणी केजरीवालांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यासाठी अधिकाऱ्यांची तयारी; कार्यक्रमाआधी सामान्यांची शिकवणी
'सिंगापूरमध्ये आढळून आलेलं कोरोनाचं नवं रूप लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक मानलं जात आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे मी सरकारला आवाहन करतो की सिंगापूरसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक तात्काळ रोखण्यात यावी आणि लहान मुलांसाठी असलेल्या लसींच्या पर्यायांवर प्राधान्यानं कार्यवाही करण्यात यावी,' असं केजरीवालांनी ट्विट करून म्हटलं आहे.
व्हेंटीलेटर न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू; मुलानं अंत्यदर्शनासाठी दुचाकीनं कापलं ७०० किमी अंतर, पण...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहानग्यांना असल्यानं त्यादृष्टीनं आतापासूनच तयारी करण्यात यावी, असं आवाहन काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्राला केलं. 'येणाऱ्या दिवसांत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल. त्यामुळे त्यांचे उपचार, लसीकरणाचे प्रोटोकॉल आताच निश्चित व्हायला हवेत,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. देशाच्या भविष्यासाठी वर्तमानात मोदी सिस्टिमला झोपेतून जागं होण्याची गरज असल्याचं टीकास्त्रदेखील त्यांनी सोडलं होतं.