CoronaVirus News: 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट टोक गाठणार; गृह मंत्रालयानं पीएमओला सोपवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 02:54 PM2021-08-23T14:54:28+5:302021-08-23T14:54:48+5:30

CoronaVirus News: गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं पंतप्रधान कार्यालयाला दिला अहवाल

CoronaVirus News third wave warning in the country ministry of home affairs tell coronavirus peak in october | CoronaVirus News: 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट टोक गाठणार; गृह मंत्रालयानं पीएमओला सोपवला अहवाल

CoronaVirus News: 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट टोक गाठणार; गृह मंत्रालयानं पीएमओला सोपवला अहवाल

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ लागला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं पंतप्रधान कार्यालयाला महत्त्वाचा अहवाल दिला आहे.

ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लाट टोक गाठेल अशी भीती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलचा अंदाज संस्थेनं अहवालातून वर्तवला आहे. याआधी कानपूर आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री प्रा. मणींद्र अग्रवाल यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर असल्याचं म्हटलं. लसीकरणाचा वेग वाढल्यानं तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. यापुढे कोरोना संक्रमणाचा वेग कमी कमी होत जाईल, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

ऑक्टोबरमध्ये देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आसपास असेल, असं आयआयटीचं सर्वेक्षण सांगतं. कोरोना रुग्णांच्या संख्येचा अभ्यास करून अग्रवाल यांनी याआधी अनेकदा सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेबद्दलचा त्यांचा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरला होता. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास शून्य असल्याचं अग्रवाल यांनी अहवालात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या अतिशय कमी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Web Title: CoronaVirus News third wave warning in the country ministry of home affairs tell coronavirus peak in october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.