CoronaVirus News: कर्नाटकातील चारपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:45 AM2020-05-01T03:45:30+5:302020-05-01T03:45:38+5:30
उपमुख्यमंत्री अश्वथनारायण, पर्यटनमंत्री सी. टी. रवी, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, गृहमंत्री बसवराज बोम्मई या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले.
बंगळुरू : कोरोनाची लागण झालेल्या येथील एका कॅमेरामनच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइनमध्ये असून, दोन मंत्री मात्र खुलेपणाने फिरत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अश्वथनारायण, पर्यटनमंत्री सी. टी. रवी, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, गृहमंत्री बसवराज बोम्मई या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
स्थानिक वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने
२० एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्याने या चारही मंत्र्यांच्या मुलाखतींचे चित्रीकरण केले. त्यानंतर काही दिवसांनी गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमण्णा यांचीही मुलाखत त्याने चित्रित केली. कोरोना व्यक्तीच्या संपर्कात येऊनही जरी संसर्ग झाला नसेल तरी त्या दुसऱ्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहावे असा नियम आहे. त्यामुळे कॅमेरामनच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइनमध्ये आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर तसेच गृहनिर्माणमंत्री सोमण्णा यांनी ते केले नाही. सुधाकर तर मंड्या येथे दौºयावर जाऊन आले.
चुकीचे वर्तन : काँग्रेस
होम क्वारंटाइनचा नियम न पाळणाºया मंत्र्यांवर टीका करताना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, ज्यांनी लोकांना आदर्श घालून द्यायचा ते मंत्रीच नियम पाळेनासे झाले आहेत.