CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:57 PM2021-05-11T18:57:03+5:302021-05-11T18:57:24+5:30
CoronaVirus News: मुलानं धाव घेतल्यानं महिलेचा जीव वाचला; दोन्ही वॉर्ड बॉय फरार
ग्वाल्हेर: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अभावी अनेक रुग्ण प्राण सोडत आहेत. अशा परिस्थितीत कुठे माणसुकी जिवंत असल्याची उदाहरणं पाहायला मिळत असताना काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.
मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील जिल्हा रुग्णालयातील एका कोरोनाग्रस्त महिलेचा ऑक्सिजन पाईप काढून तिला मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं हा प्रकार तिच्या मुलानं पाहिला. त्यानं दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्याला धक्का देऊन पळून गेले. यानंतर डॉक्टरांनी ऑक्सिजन पाईप पुन्हा लावला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सतर्कता! कोरोनावरील उपचारासाठी ‘या’औषधाचा वापर करणं धोक्याचं; WHO चा इशारा
गुढा परिसरात वास्तव्यास असलेल्या ४९ वर्षीय पूनम वीरे काही दिवसांपासून आजारी होत्या. आठ दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनी आणि यकृतावर कोरोना संक्रमणामुळे परिणाम झाला होता. पूनम यांची प्रकृती गंभीर असून त्या काही दिवसच जिवंत राहू शकतील, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर त्यांचा मुलगा दीपकनं त्यांना मुरार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल केलं.
आईची काळजी घेण्यासाठी दीपक स्वत: रुग्णालय परिसरात बाहेर बसून असायचे. ते खिडकीतून आपल्या आईला पाहायचे. रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता दीपक लघुशंकेला जात होते. त्यावेळी रुग्णालयाचे दोन वॉर्ड बॉय (राहुल आणि सोनू) वॉर्डमध्ये होते. दीपक परतत असताना त्यांना हे दोन वॉर्ड बॉय आईला लावण्यात आलेला ऑक्सिजन पाईप काढताना दिसले. दीपकनं आरडाओरडा करत दोघांना पकडलं. मात्र ते दोघे धक्का देऊन तिथून पळून गेले. त्या दोघांनी दीपक यांच्या आईचे कानातले लंपास केले. पोलीस सध्या त्या दोघांचा शोध घेत आहेत.