CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:36 PM2020-05-26T15:36:14+5:302020-05-26T15:36:46+5:30

CoronaVirus News : उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी ही माहिती दिली आहे. 

CoronaVirus News : uber lays off 600 staff as covid 19 hits ride business vrd | CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Next

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदेही ठप्प आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असून, अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांना पगार कुठून द्यावा हा प्रश्न सतावतो आहे. कोरोनाच्या संकटामुळे उबर इंडियानंही 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. देशातील कंपनीच्या कर्मचार्‍यांपैकी कपातीचं प्रमाण हे 25 टक्के आहे. टाळेबंदीमुळे कपात करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये ड्रायव्हर्स, रायडर सपोर्ट यांचा समावेश आहे. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी ही माहिती दिली आहे. 

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर उबर इंडियानं हे पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. बऱ्याच व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. परमेश्वरन म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे, त्यांना 10 आठवड्यांचा पगार देण्यात येणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांकरिता विमासुद्धा दिला जाणार आहे. तसेच कंपनी काढून टाकण्यात आलेल्या  कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यासाठीही सहकार्य करणार आहे. 

परमेश्वरन म्हणाले,  कोरोनाच्या परिणामामुळे आणि देशातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे उबर इंडियाकडे आपल्या कर्मचार्‍यांची कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आज उबर कुटुंबासाठी आणि आपल्या सोडून जात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुःखद दिवस आहे.  विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिकेतील उबर टेक्नॉलॉजीज (जी उबर इंडियाची मूळ कंपनी आहे) यांनी कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे आपल्या कर्मचा-यांमध्ये 23 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

Web Title: CoronaVirus News : uber lays off 600 staff as covid 19 hits ride business vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.