CoronaVirus News: कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌ची नावे का बदलली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:14 AM2021-06-03T06:14:55+5:302021-06-03T06:15:11+5:30

भारतात विषाणूंचे दोन प्रकार

CoronaVirus News Why were the variants of Corona renamed | CoronaVirus News: कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌ची नावे का बदलली?

CoronaVirus News: कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌ची नावे का बदलली?

Next

गेल्या वर्षभरापासून जगभरात मुक्काम ठोकून असलेल्या कोरोना विषाणूचे विविध ठिकाणी उत्परिवर्तन झाले. प्रत्येक देशात त्याला वेगवेगळी नावे देण्यात आली. मात्र, त्या त्या देशांची नावे त्या उत्परिवर्तित विषाणूला चिकटली. ही नावे बदलावीत अशी मागणी संबंधित देशांनी केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ती बदलली.

कोणी घेतला होता आक्षेप
ज्या ज्या देशांमध्ये कोरोनाचे व्हेरिएंटस्‌ सापडले त्यांना त्या देशाचे नाव देण्यात आले.
प्रसारमाध्यमेही संबंधित व्हेरिएंटस्‌च्या नावापुढे त्या देशाचे नाव वापरू लागले.
या प्रकाराला भारताने आक्षेप घेतला.
संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या दस्तावेजात कोरोनाच्या भारतीय उत्परिवर्तनाला कुठेही ‘भारतीय व्हेरिएंट’ म्हटले नसल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने विदेशी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.
डब्ल्यूएचओने त्याची दखल घेत व्हेरिएंटस्‌ची नावे बदलली

ग्रीक मुळाक्षरेच का?
कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌साठी ग्रीक मुळाक्षरांचा वापर करण्याचा निर्णय डब्ल्यूएचओने घेतला.
सुरुवातीला व्हेरिएंटस्‌ना ‘व्हीओसी १’, ‘व्हीओसी २’ या नावांनी ओळखले जावे, असे ठरले; परंतु ते इंग्रजीतील शिवराळ शब्द असल्याचे समजल्याने ती नावे मागे पडली.
वस्तुत: विषाणूला त्याच्या उगमस्थानावरूनच ओळखले जाते.
मात्र, कोरोना विषाणूने विविध देशांत विविध रूपे घेतल्याने त्या-त्या देशांच्या नावाने ते व्हेरिएंटस्‌ ओळखले जात.

बी.१.१.७
पहिली नोंद : सप्टेंबर, २०२०
ब्रिटन
या व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती.

बी.१.३५१
पहिली नोंद : ऑक्टोबर, २०२०
दक्षिण आफ्रिका

पी.१
पहिली नोंद : डिसेंबर २०२०
ब्राझील

बी.१.६१७
ऑक्टोबर २०२०
भारत
‘बी.१.६१७.१’ 
कप्पा
‘बी.१.६१७.२’ 
डेल्टा

भारतातील व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरत असल्याचा दावा.

Web Title: CoronaVirus News Why were the variants of Corona renamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.