VIDEO: सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट हातच जोडले; पाहा नेमके काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:40 PM2020-05-17T17:40:36+5:302020-05-17T17:42:53+5:30
स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरुन अर्थमंत्री विरोधकांवर भडकल्या; सोनिया, राहुल गांधींवर निशाणा
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे होत आहेत. हाताला काम नसल्यानं लाखो मजूर, कामगार शहरं सोडून गावाकडे जाऊ लागले आहेत. या ज्वलंत प्रश्नावरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी यावरुन राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असं सीतारामन पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
#WATCH "I want to tell the opposition party that on the issue of migrants we all must work together.We are working with all states on this issue. With folded hands, I say to Sonia Gandhi ji that we must speak & deal with our migrants more responsibly": Finance Minister Sitharaman pic.twitter.com/fV96VwLPEW
— ANI (@ANI) May 17, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी काल स्थलांतरित मजुरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावरुनही सीतारामन यांनी टीका केली. राहुल ड्रामेबाजी करत असून त्यांनी मजुरांचा वेळ वाया घालवला, असं सीतारामन म्हणाल्या.
स्थलांतरित मजुरांच्या विषयाचं राजकारण करू नका, असं आवाहन विरोधकांना करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. 'स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्व राज्य सरकारांच्या सोबतीनं काम करत आहोत. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नी त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असं मी त्यांना हात जोडून सांगू इच्छिते,' अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी सोनिया गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
जाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?
मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...
आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा