CoronaVirus News: श्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; महाराष्ट्राला मोठा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:43 PM2020-05-19T18:43:25+5:302020-05-19T18:44:51+5:30

CoronaVirus News: आता श्रमिक रेल्वे गाड्या सुस्साट सुटणार; रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

CoronaVirus No consent required from destination states for Shramik Special trains kkg | CoronaVirus News: श्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; महाराष्ट्राला मोठा फायदा होणार

CoronaVirus News: श्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; महाराष्ट्राला मोठा फायदा होणार

Next

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवणाऱ्या रेल्वे मंत्रालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडताना, ज्या राज्यांमध्ये गाड्या सोडल्या जाणार त्यांची परवानगी आवश्यक नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासाठी रेल्वेनं एक मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) जारी केली आहे. 

आतापर्यंत रेल्वे गाडी सोडताना ज्या राज्यांमध्ये रेल्वे गाडीचं शेवटचं स्थानक आहे, त्या राज्याची परवानगी आवश्यक होती. मात्र आता तशा परवानगीची आवश्यकता नाही. नव्या एसओपीमुळे ज्या ठिकाणी रेल्वेचं शेवटचं स्थानक आहे, त्या राज्य सरकारची परवानगी गरजेची नसेल, अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते राजेश वाजपेयी यांनी दिली. या निर्णयाचा अप्रत्यक्ष फायदा महाराष्ट्राला होईल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल.

पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगडमधील सरकारं श्रमिक विशेष गाड्यांना मंजुरी घेताना चालढकल करत असल्याचा आरोप रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे वादंग माजला. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगडमध्ये भाजपेतर पक्षांची सत्ता आहे. प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी १ मेपासून हजारपेक्षा जास्त रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामधून २० लाखांहून जास्त मजुरांना घरी सोडण्यात आलं आहे. 

काय म्हणाले होते पीयूष गोयल?
रेल्वेनं प्रवासी मजुरांना घरी सोडण्यासाठी १२०० गाड्या सोडल्या आहेत. मात्र पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान यांच्यासारखी काही राज्यं मजुरांना घरी सोडण्याची परवानगी देत नाहीत, असं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. पश्चिम बंगाल सरकारला गृहमंत्र्यांनी पत्र लिहिल्यानंतरही त्यांनी ९ मेपर्यंत केवळ दोन गाड्यांना परवानगी दिल्याचंदेखील गोयल ट्विटमध्ये म्हणाले होते.

"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"

कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

Web Title: CoronaVirus No consent required from destination states for Shramik Special trains kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.