Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:25 AM2021-05-24T06:25:32+5:302021-05-24T06:26:35+5:30

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

Coronavirus: No evidence of Third wave is danger to children, doctors, experts agree | Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

googlenewsNext

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल यावर देश आणि जगातील डॉक्टर्स पूर्णपणे सहमत नाहीत. विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
इटलीचे डॉक्टर टोटा लुइगी यांचा तर्क आहे की, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारावर ही तिसरी लाट मुलांमध्ये सर्वात जास्त पसरेल आणि ती त्यांच्या जीविताला धोका ठरेल, असे म्हणता येत नाही. जगात मुलांसाठी कोणतीही लस नाही यामुळे असा समज निर्माण होतो.

दिल्लीतील बालरोग विशेषज्ञ डॉक्टर हेमा बिष्ट म्हणतात की, “लाट दुसरी असो वा तिसरी मुलांना संक्रमणापासून दूर ठेवणे महत्त्वाचे. परंतु, तिसऱ्या लाटेचे संकेत असतील तर केवळ त्या आधारावर मुलांना बाधा होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ऑक्सफ़ोर्डचे डॉक्टर अमित गुप्ता मानतात की, “आज जे काही उपलब्ध आहे त्या आधारावर तुम्ही मुलांमध्ये संक्रमण होईल, असे म्हणता. परंतु, तसे म्हणणे घाईचे ठरेल. कारण या मुद्यावर अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही.” हा नवा म्युटेंट मुलांना संक्रमित करू शकतो. या म्युटेंटबाबत ही  गोष्ट पूर्ण शक्य आहे की, मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसणार नाहीत परंतु त्यांना त्याची बाधा होऊ शकते. डॉक्टर्स आणि विशेषज्ञही माहिती कमी उपलब्ध असल्यामुळे संभ्रमात आहेत. 

आम्हाला तयार राहावे लागेल-गुलेरिया
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “सामान्यत: हे पाहण्यात आले आहे की, अशा प्रकारची महामारी तीन टप्प्यांत आपला प्रभाव निर्माण करते. तिचा 
दुसरा टप्पा सर्वांत जास्त धोकादायक समजला जातो. तिसरी लाट मुलांना संक्रमित करील याबद्दल जे बोलले जात आहे त्यात स्पष्टता नाही. कारण आतापर्यंत जगातून जी माहिती मिळाली त्या आधारावर कोणतीही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. 
कारण म्युटेंटचा स्वभाव पाहता मुलांबाबत आम्हाला तयार राहावे लागेल. कारण आज आमच्या हाताशी कोणतीही लस उपलब्ध नाही.”

कोरोनामुक्त झाल्यावर एक वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम 
टोकियो : कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारीरिक स्थितीची चाचणी केली.
    २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

Web Title: Coronavirus: No evidence of Third wave is danger to children, doctors, experts agree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.