coronavirus: मोदीस्टाईल गमचा नव्हे, मास्क करतो कोरोना विषाणूपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:10 AM2020-08-31T04:10:23+5:302020-08-31T04:31:29+5:30

ज्या मास्कमधून हवा फिल्टर होईल व जो कपड्याचा बनलेला असेल, तो सुरक्षित आहे. गमचा, सर्जिकल मास्क व वॉल्व्ह असणारे मास्क सुरक्षित नाहीत.

coronavirus: No Modystyle gumcha, mask will protects you from Corona virus | coronavirus: मोदीस्टाईल गमचा नव्हे, मास्क करतो कोरोना विषाणूपासून संरक्षण

coronavirus: मोदीस्टाईल गमचा नव्हे, मास्क करतो कोरोना विषाणूपासून संरक्षण

Next

- एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क व डिस्टन्सिंगमुळे बचाव करता येऊ शकतो. त्यातही कोणता मास्क योग्य आणि कोणता नाही, यावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गळ्यातील गमच्यालाच मास्कच्या रूपात तोंडावर झाकून घेतात. त्यामुळे लोकांत चर्चा सुरू आहे की, आम्ही मात्र मास्क घातलेला नसल्यावर पोलीस कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या दंडाचीही पावती फाडतात.
आयआयटी, दिल्लीच्या टेक्स्टाईल विभागाचे सहायक प्रोफेसर व कोरोनापासून बचाव करण्यासाठी कवच-मास्क बनवणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बिपीनकुमार यांचे म्हणणे आहे की, ज्या मास्कमधून हवा फिल्टर होईल व जो कपड्याचा बनलेला असेल, तो सुरक्षित आहे. गमचा, सर्जिकल मास्क व वॉल्व्ह असणारे मास्क सुरक्षित नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हाच सल्ला आहे की, त्यांनी गमच्याऐवजी आयआयटी दिल्लीने मेक इन इंडियाच्या मोहिमेंतर्गत बनवलेला ४५ रुपये किमतीचा मास्क वापरावा. कोरोना व्हायरसचा आकार ०.३ मायक्रॉन म्हणजेच एक मिलीमीटरच्या एक हजाराव्या भागापेक्षाही छोट्या कणाएवढा आहे.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, थ्री लेअर कपड्यापासून तयार केलेला मास्क पार्टिकल्स रोखण्यास साहाय्यभूत ठरतो. सुरक्षित मास्कबाबत बोलायचे झाले, तर रेस्पिरेटरसह येणारे मास्क जास्त सुरक्षित मानले जातात.

ते सील टेस्टेड रेस्पिरेटर्स फायबरपासून बनवले जातात. ते हवा फिल्टर करण्यात सर्वांत फायदेशीर ठरतात. सर्टिफाईड एन-९५ रेस्पिरेटर्स ९५ टक्क्यांपर्यंत पार्टिकल्स फिल्टर करू शकतात. एन-९९ रेस्पिरेटर्स पार्टिकल्सला ९९ टक्क्यांपर्यंत फिल्टर करू शकतात.

Web Title: coronavirus: No Modystyle gumcha, mask will protects you from Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.