Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 12:11 PM2020-04-28T12:11:31+5:302020-04-28T16:41:23+5:30
आता भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते भाजी खरेदी करण्यावरुन लोकांना आवाहन करत आहेत.
देवरिया – कोरोना व्हायरस महामारी रोखण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. मात्र अशा संघर्ष काळात काही अशा घटना समोर येत आहे ज्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण केले जाईल. तबलीगी जमातीच्या काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच समाजातील एका वर्गाला टार्गेट करण्याचेही प्रकार घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्व नेते या संकटकाळात समाजात एकता आणि बंधुता निर्माण व्हावी असं आवाहन करत आहेत मात्र काही लोक ऐकायलाच तयार नाहीत.
आता भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते भाजी खरेदी करण्यावरुन लोकांना आवाहन करत आहेत. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश तिवारी यांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ भाजपा आमदार काही लोकांना सांगत आहेत की, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सर्वांना खुलं सांगतो. कोणीही मिय़ा(मुस्लीम) यांच्याकडून भाजी खरेदी करु नका असं सांगतात.
जेव्हा आमदार याबद्दल बोलतात तेव्हा त्याच वेळी मागून कोणी त्यांना सांगते की दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीमध्ये एका व्यक्तीने मुस्लीम भाजी विक्रेत्यास त्याचे नाव विचारून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, अशा घटना देशाच्या इतर भागातही घडत आहेत.
अलीकडेच जमशेदपूरच्या फळांच्या दुकानांवर विश्व हिंदू परिषदेच्या पोस्टर्सची छायाचित्रे समोर आली आहेत. या पोस्टरमध्ये हिंदू फळांचे दुकान लिहिलेले आहे आणि ते दुकानाच्या बाहेर लावण्यात आलं आहे. पोस्टरबाबत जमशेदपूर पोलिसांनीही लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मेरठमधील व्हॅलेंटीस कर्करोग रुग्णालयाने अशी जाहिरात प्रकाशित केली आहे की ज्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे त्याच मुस्लिमांनी यावे. मुंबईत एका व्यक्तीने मुसलमान असल्याने मुलाकडून डिलिव्हरी सामान घेण्यास नकार दिला. याशिवाय दिल्लीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात भाजीपाला किंवा इतर हाताळणी करणारे आधार कार्ड पाहून एन्ट्री दिली जात आहे
आतापर्यंत सामान्य लोक अशा भेदभाव करणार्या घटनांमध्ये सामील झाल्याचं दिसत होते, परंतु यूपीचे भाजपाचे आमदार सुरेश तिवारी हे लोकप्रतिनिधी असल्याचे हे विधान चिंताजनक आहे. तथापि, हा व्हिडीओ ४-५ दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे, परंतु तबलीगी जमातशी संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनीही कोरोना कोणत्याही धर्माशी, जातीशी जोडू नका असं आवाहन केले होते. तरीही त्यांच्याच पक्षाच्या आमदाराकडून अशाप्रकारे वक्तव्य होणं दुर्दैवाचे आहे.
अन्य बातम्या
कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईला मिळाली ‘सुपर मशीन’; आता दुप्पट क्षमतेने होणार लढाई!
अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोपे नसते; भाजपा नेत्याकडून शिवसेनेच्या टीकेचा समाचार
लोक कोरोनाशी लढताहेत; पण सरकार कुठे आहे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल
...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ
कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले...