Coronavirus: ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने दुचाकीवरून घरी आणला लेकीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:47 AM2021-04-28T05:47:07+5:302021-04-28T05:50:11+5:30

फिरोजाबादमधील एका १९ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Coronavirus: No oxygen, no treatment; Hatbal's father brought Leki's body home on a two-wheeler | Coronavirus: ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने दुचाकीवरून घरी आणला लेकीचा मृतदेह

Coronavirus: ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने दुचाकीवरून घरी आणला लेकीचा मृतदेह

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हतबल झालेल्या बापाने दुचाकीवरून लेकीचा मृतदेह घरी आणला. 

फिरोजाबादमधील एका १९ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिचे वडील शिवनारायण यांनी तिला बाइकवरून सरकारी रुग्णालयात नेले. या रुग्णालयात ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. वेळेत योग्य उपचार आणि ऑक्सिजन न मिळाल्याने मुलीला आपला जीव गमवावा लागला. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकादेखील मिळाली नाही.  नियमांनुसार, मृतदेह वाहनातून घरी पाठवण्यात येतो. मात्र, अशी कोणतीच सोय ही सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नव्हती. शेवटी हतबल झालेल्या बापाला आपल्या लेकीचा मृतदेह हा बाइकवरूनच आणावा लागला. 

Web Title: Coronavirus: No oxygen, no treatment; Hatbal's father brought Leki's body home on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.